मीरा अलफास्सा ते माताजी एक प्रवास.
आपण सर्वजण ज्यांना श्री अरविंद आश्रमाच्या माताजी म्हणून ओळखतो त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1878 ला पॅरिस येथे मॉरीस आणि मेथिलडे अल्फासा-यांच्या कुटुंबामध्ये मीरा अल्फासा या नावाने झाला. त्यांचे आई-वडील दोघेही बँक क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्यात खरेच अलौकिक प्रतिभा व सामर्थ्य यांचे दर्शन लहानपणी पासूनच दिसत होते. त्यांना पाचव्या वर्षीच हे माहीत होते की “प्रत्येकाने …