
सूर्यालोकित पथ
ह्या पुस्तकात,श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांशी व शिष्यगणांशी मताजींच्या संभाषणातील उतारे आहेत.माताजी आपल्या श्रोत्यांना आणि वाचकांना आध्यात्मिक आत्म-परिपपूर्णतेचा मार्ग धैर्याने स्वीकारून साहसी आवाहनांना उत्तरदेण्यासाठी आमंत्रित करतात.आपले विचार कसे नियंत्रित करावेत,आपल्या आजूबाजूला असणारे अहंकाराचे कठोर कवच कसे तोडावे,परिपूर्णतेची आवश्यकता ,अशा प्रकारे अवघड मनस्थितीमध्ये असलेल्या साधकाला अंधःकारातून सूर्यप्रकाशाच्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शकपर ठरतात.
हे पुस्तक इंग्रजी भाषे व्यतिरिक्त हिंदी,बंगाली,गुजराती,तमिळ,तेलगू अश्या भारतीय भाषांमध्येही प्रकाशितझालेआहे.प्रथम आवृत्ती १९८४ साली झाली असून २००८ सालपर्यंत आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
खऱ्या अर्थाने अध्यात्मिक जीवनाचा पाठपुरावाकरणे अनेकदा अडचणी,अडथळ्यांनी भरलेले असते.त्यात संशय,अंधाराचा काळ आव्हाने सुरूच असतात.कृतज्ञतापूर्वक सांगावेसे वाटते,मताजींच्या शिकवणुकीचा ‘सूर्यप्रकाशाचा मार्ग’ सापडतो,तेव्हा साधक अध्यात्मिक ध्येयाकडे झपाट्याने पावलं टाकू शकतो आणि अनेक आव्हाने येऊन देखील आपला विश्वास आणि शांतता अबाधित ठेऊ शकतो.
जवळपास १८६ पानांच्या ह्या पुस्तकात ‘सूर्यप्रकाशमार्गाचे’ विविध पैलू मताजींच्या संकलितकेलेल्या उताऱ्यांद्वारे स्पष्टकेलेआहेत.ह्यातील बहुतांश संभाषणे शिष्य आणि विद्यार्थ्यांशी केलेले आहेत.
आपण ज्यावेळी एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालत जात असतो,आपली अभिप्सा उच्च पातळीवर असते,पण आपल्या मनात गोंधळ मात्र वाढतच जातो, त्यात व्यवहारात जगताना नात्यांचा भावनिक गुंता …त्यात अडकले की नको ती साधना,काहीच नको असे होऊन भ्रमिष्ट व्हायला होते, त्यावेळी नेमके असे मार्गदर्शन हवे असते की ज्यामुळे आपली आध्यात्मिक अभिप्सा उन्नत होत जाईल,तसेच व्यवहारात जगताना अनेक अडथळे अगदी सहज पार होते,,असे हे मार्गदर्शखूप काही देऊन जाते.
ह्या पुस्तकात परिच्छेद खलील शीर्षकाखाली मांडलेले आहेत,ज्यात श्रीमताजींच्या जीवनाचे संक्षिप्त रेखाटन आणि संस्कृतचा शब्दकोश व इतर संज्ञा यांचा समावेशआहे.
१. आमंत्रण
२.शिक्षणाचे मूल्य
३. नैतिकता,धर्म,योग ४.आत्मसमर्पण,आत्मार्पण,
नम्रता
५.प्रामाणिकपणा,दक्षता,इच्छाशक्ती
६.इतर व्यक्ती आणि शक्ती
७.धैर्य,सहनशक्ती,प्रयत्न
८.ग्राहनक्षमता आणि आकांक्षा
९.एकाग्रता,ध्यान,कार्य
१०.दैवी कार्य
११.शांतता आणि शांतता
१२.आत्मा,आणि मानसिक अस्तित्व
१३.अहंकार आणि स्वतःला लाभलेली देणगी
१४.विश्वास व कृपा
१५.विचारांवर नियंत्रण
१६.मन आणिसंवेदना विकसितकरणे
१७.सांसारिक घडामोडी
१८.शब्द,मत,निर्णय क्षमता
१९.दिव्य जग आणि मनुष्य
एकदा एका शिष्याने एक फार सुंदर प्रश्न विचारला,,,”प्रिय माताजी,योग आणि धर्म ह्यात फरक काय हो?…”
माताजी म्हणाल्या ,” माझ्या प्रिय बाळा,हा असा प्रश्न आहे की कुत्रा आणि मांजरी मध्ये काय भेद आहे….!” दीर्घ शांततेतून बाहेर येऊन माताजी पुढे म्हणतात,…”हे तस आहे,जस आपण ईश्वराबद्दल ऐकतो,आणि ईश्वर स्वतः अनुभवतो…..त्याच प्रेमळ अस्तित्व,शोधायचा आतून प्रयत्नकरतो,शिस्तीने आपल्या मनाला वळण लावून आपण एकाग्रतेने,आपले सगळे प्रयत्न लावून ईश्वर शोधण्याचा प्रयत्न करतो,तो कसा आहे,काय आहे हे शोधतो,तो व्यक्ती ‘योग’ करतो………आता हाच व्यक्ती जर सगळे मुद्दे लिहून,एक पक्की अशी व्यवस्था बनवतो,नियम बनवतो,कायदा बनवतोजस,ईश्वर हा असाच आहे,अशानेच कळतो,असाच दिसतो,हेच केल्याने दिसतो,त्यावेळी धर्म बनतो….”
अशा प्रकारे आपल्या साधना मार्गात येणाऱ्या अनेक छोट्यामोठ्या प्रश्नांचे निरसन आपल्याला ह्या पुस्तकात होते.आध्यात्ममार्गावर चालणाऱ्या सच्च्या साधकाने आपल्याजवळनेहमी ठेवावे आणि अधूनमधून पुन्हापुन्हा वाचावे असे हे पुस्तकआहे,जितक्या वेळा वाचू प्रत्येकवेळीवेगळी अनुभूती येते हे निश्चित.