

मी इतरांना मदत करतो’ या विचारामध्ये एक सूक्ष्म अहंकार डोकावतो. केवळ दिव्य शक्तीच कोणाचीही मदत करू शकते. या दिव्य शक्तिमार्फत मदत करणारे आपण एक ‘साधन’ होऊ शकतो. मात्र त्यासाठी आधी आपण ‘सुयोग्य व अहंकाररहित साधन’ होण्यास शिकले पाहिजे.
– श्रीअरविंद

आत्म्यात अंतर्निहित असलेली योगातील मूलभूत श्रद्धा आहे की दिव्यत्व अस्तित्वात आहे आणि ‘दिव्यत्वाला अनुसरणे’ याच्या योग्यतेची दुसरी कोणतीही गोष्ट जीवनात नाही.
श्रीअरविंद

सत्कृत्य आणि दुष्कृत्य म्हणजे आपल्याला पूर्णत्वाकडे नेण्याच्या परमेश्वराच्या प्रयत्नांशी आपण खेळलेला एक विरोधाचा खेळ आहे.
श्रीअरविंद

मन जेव्हा निश्चल होते तेव्हा त्या नीरव शांततेत सत्य ऐकण्याची संधी मिळते.
श्रीअरविंद

स्वतःवर मिळवलेला प्रत्येक विजय अधिकाधिक यश प्राप्त करण्यासाठीचे नवीन सामर्थ्य असते.
श्रीअरविंद

विश्वास आणि शांत आनंददायी श्रद्धा हा साधनेचा उत्कृष्ट पाया आहे .
श्रीअरविंद

श्रीअरविंद

दिव्य शक्तीवर श्रद्धा ठेवा. ती तुमच्यातले ईश्वरी घटक वेगळे काढून त्यांना असा आकार देईल ज्यामुळे त्यांचं आविष्करण ईश्वरी/ दैवी स्वभावात होईल. श्रीअरविंद

जेव्हा सर्वात वाईट गोष्ट घडायची असेल तेव्हा ईश्वर आपल्याला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन करतो, प्रेमाची पाखरण सर्वात जास्त करतो जेव्हा कठोर शिक्षा तो देतो आणि परिपूर्ण मदत करतो जेव्हा त्याने जोरदार विरोध केलेला असतो.
श्रीअरविंद

देव-स्पर्शाने सर्व काही शक्य आहे.
श्रीअरविंद
परब्रह्माशी संपर्क प्रस्थापित करण्याचे शेकडो स्वरूपाचे मार्ग आहेत. ज्या स्वरूपाचा मार्ग आपण निवडला असेल त्याच स्वरूपाचा (परब्रह्माशी जोडणारा) अंतिम अनुभव येईल. तो अनुभव अनिर्वचनीय / शब्दातीत असतो.
श्रीअरविंद