मानवी उन्नयनाचे महामंदिर Auroville – उषानगरी

नव्या वर्षाचे, स्वागत करताना Auroville चे नागरिक – मातृमंदिर, ऑरोविल्-उषानगरी

एकाच जागी मानवता, अध्यात्म, शांती व विश्वकल्याण इत्यादी बाबी एकत्रितपणे कार्यरत होऊन जगाच्या पुनरुत्थानासाठी पुढे सरसावतील का ? असा एक प्रश्न नियतीला पडला असावा आणि त्याच्या उत्तरादाखल भारतातील पांडिचेरी येथे Auroville म्हणजेच उषा नगरीचे निर्माण झाले असावे असे वाटते. नेमकं काय घडलं असावं ?

तसे पाहू जाता पाँडिचेरी भारताचे अभ्युदय घडवणारे एक सर्वव्यापी असे आध्यात्मिक तिर्थक्षेत्र आहे. ती एक पुण्यनगरी आहे. मानव कुळाच्या आसनावर वैश्विक ऐक्याची मंगलमूर्ती बसवून मनुष्य कल्याणाचा अखंडितपणे वसा घेतलेल्या मोजक्या वेचक आणि वेधक अशा पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे पाँडिचेरी येथील श्री अरविंद आश्रम आहे.

महायोगी श्री अरविंद आपल्या अध्यात्मिक आणि मनुष्य कल्याणाच्या कार्याचा लेखाजोखा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी सादर करण्यासाठी 1950 साली महासमाधी घेऊन अंतर्धान पावले. मात्र त्यापूर्वीच  चाळीस वर्षे त्यांनी मौनाच्या गुंफेत बसून मनुष्य कल्याणाची मुहूर्तमेढ रोवली. महा योगी अरविंद हयात असताना आणि त्यांच्या महासमाधी नंतरही मीरा रिचर्ड म्हणजेच, the mother, माताजी यांनी श्री अरविंद यांचे कार्य पुढे नेले.

त्याचाच एक भाग म्हणून 1964 मध्ये झालेल्या श्री अरविंद आश्रमाचा वार्षिक परिषदेत, श्री अरविंद सोसायटी द्वारे श्री अरविंद ह्यांच्या नावाने एक वैश्विक गाव वसवायचे असे ठरवले होते. त्याद्वारे मानवतेची वाटचाल दिव्य जगाकडे सुरू व्हावी आणि त्याद्वारे चांगुलपणाचा शुद्ध भावनेचा आणि निधी ध्यास घ्यावा अशी त्यामागील निरलेप आणि प्रांजळ भूमिका होती. त्याद्वारे 1968 ला भारतातील पॉंडिचेरी येथे Auroville म्हणजेच उषा नगरीचे निर्माण झाले.

त्याद्वारे 1968 ला भारतातील पॉंडिचेरी येथे Auroville म्हणजेच उषा नगरीचे निर्माण झाले

उषानगरी मानवी कल्याणाची विवंचना वाहणारे आणि त्यादृष्टीने निरंतर पावले टाकण्याचे बळ साऱ्यांना देणारे एक अखंड उर्जास्त्रोत आहे. श्री अरविंद आणि माताजी प्रणित परमार्थ साधनेचे ते सार आहे. स्वार्थाचा आणि आत्मकेंद्रिततेचा कचरा साठल्यावर विमल अशा विचारांची गंगा विशुद्धतेचा मार्गावर वाहत मिळणारा तो एक प्रवाह आहे.

श्री माताजींच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास

Auroville wants to be a universal town where men and women of all countries are able to live in peace and progressive harmony above all creeds, all politics, and all nationalities. The purpose of Auroville is to realize human unity.”

म्हणजेच, “उषानगरी हे असे एक वैश्विक गाव व्हावे जिथे जगाच्या सर्व राष्ट्रातील पुरुष आणि स्त्रिया गुण्यागोविंदाने आणि शांती पूर्वक नांदतील आणि त्यांचे जगणे राजकारणविरहित आणि पंथळी राष्ट्रांच्या सीमा नदीच्या पल्याड असेल मानवी ऐक याचा अर्थ उमगणे हाऊशा नगरीचा स्थापनेमागचा मुख्य अर्थ आणि उद्देश आहे”

Auro चा फ्रेंच भाषेत अर्थ होतो पहाट. Ville चा अर्थ होतो गाव. म्हणून Auroville – उषानगरी हे नाव रूढ झाले. Auro ha शब्द श्री अरविंद यांच्या इंग्रजी नावात सुद्धा आहे, हा एक निव्वळ योगायोग.  उषानगरीच्या उद्घाटनपर कार्यक्रमासाठी जगातले 124 देशांच्या महानुभावांनी हजेरी लावली होती. त्याच कार्यक्रमात उषा नगरीची पुढील उद्देशिका सादर करण्यात आली की स्वतःला श्री माताजी यांनी तयार केली होती.

  1.  Auroville belongs to nobody in particular. Auroville belongs to humanity as a whole. But to live in Auroville, one must be the willing servitor of the Divine Consciousness.

तसे पाहता उषा नगरी ही केवळ काही मोजक्या लोकांची मिरासदारी नव्हे. तिचा थेट संबंध आणि बांधिलकी संपूर्ण मानवतेची आहे. मात्र इथे राहण्यासाठी असणारी अट म्हणजे दिव्य चेतन्य प्रति असणारी कटिबद्धता.

  1.  Auroville will be the place of an unending education, of constant progress, and a youth that never ages.

उषा नगरी अक्षय आणि अमर्याद शिक्षणाचे, सातत्यपूर्वक प्रगतीचे आणि वयोमर्यादा नसणाऱ्या यौवनचे स्थान असेल.

  1. Auroville wants to be the bridge between the past and the future. Taking advantage of all discoveries from without and from within, Auroville will boldly spring towards future realizations.

उषा नगरी म्हणजे भूत आणि वर्तमान यातील दुवा असेल. आजपर्यंत झालेल्या सर्व शोधांचे फायदे मिळवत अंतर्मयी वृध्दींगत होत. उषा नगरी भविष्यकालीन जाणीव आणि नेणीव याकडे पावले टाकेल.

  1. Auroville will be a site of material and spiritual researchers for a living embodiment of an actual human unity.

खऱ्या मानवी ऐक्यासाठी होणाऱ्या भौतिक आणि अध्यात्मिक संशोधनाचे उषा नगरी आश्रय स्थान असेल.

वर नमूद केलेली उद्देशिका म्हणजे वैश्विक पसायदानाचे सारच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कुठेही कोतेपणा चे दर्शन घडत नाही. मानवी मनाच्या संकुचितपणाला जरासुद्धा वाव नाही. जे आहे ते सारे वैश्विक, मनुष्यकल्याणकारी, सर्वव्यापी, सार्वजनिक आणि सर्वकालीन.

उषा नगरीचा परिसर जवळपास 20 चौरस किलोमीटर्स पृष्ठभागात पसरलेला आहे. पाँडिचेरी पासून दहा किलोमीटर आणि समुद्रकिनाऱ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर उषा नगरी परिसर स्थित आहे.

उषानगरीचे मातृमंदिर

उषानगरीचे मातृमंदिर देखील वैशिष्ठपूर्ण आहे. हे मातृमंदिर म्हणजे मानवाच्या पूर्णत्वाच्या निदीध्यासाचे एक दैवी उत्तर आहे. याठिकाणी निर्वात आणि निस्तब्धता अनुभवली जाते. इथे आंतरिक शांतीची सदोदित अनुभूती घडते. अनेकांना येथे स्व- चेतनेच्या उन्नयनाचा अनुभव येतो. तिथे विद्यमान असणारा सोनेरी धातूचा एक गोल, सदैव दीप्तीमानता प्रधान करतो. त्याच्या नजीकच रेसिडेन्शिअल झोन, कल्चरल अंड एज्युकेशनाल झोन, इंडस्ट्रियल झोन आणि इंटरनॅशनल झोन असे चार विभाग आहेत. जवळच एक सदाहरित प्रदेश अर्थात ग्रीन बेल्ट निर्माण केला गेला आहे, ज्याचा वापर जैवविविधतेच्या दृष्टीने आवश्यक संशोधनासाठी करण्यात येतो. उषा नगरीला भेट देणे आणि तिथे काही काळ विसावणे यासारखा आनंद नाही. तो शब्दातीत आहे.

समर्थ रामदास म्हणतात,

प्रत्ययाचे ज्ञान! तेची ते प्रमाण !!

येर अप्रमाण!   सर्वकाही !!

म्हणजेच, अनुभवाचे ज्ञान तेच उत्तम ज्ञान. त्यादृष्टीने उषा नगरीला भेट देणे आणि काही काळ तिथे राहणे, याचा अनुभव याची देही याची डोळा मला घेत आला आहे आणि त्या सर्व स्वतःला मी फार भाग्यवान समजतो. तिथे भेट दिल्याने मानवी मनाचे कसे उन्नयन घडते आणि संकुचित ते चे धोके विरून उदाहरण ते चा सूर्य कसा उगवतो हेदेखील मी अनुभवलं आहे.

येथे सारे सकारात्मक आहे. नकारात्मक असे काहीच नाही. तिथे विषयवासना, मद्य, राजकारण, टवाळक्या, निषिद्ध आहे. सारे काही स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि आल्हाददायक आहे. ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचे झाले तर सर्व काही इथे ‘मार्तण्ड जे तापहीन‘ आहे. माणसातील विवेक जागा करून त्याला सतप्रवृत्तीचे सानिध्यात नेनारे विविध उपक्रम माणसाला मनुष्य बनवणारे आहेत. इथे सारे काही विधायक आहे.

ज्या कोणाला स्वतःच्या चेतनेच्या उन्नयनाचा ध्यास आहे आणि ती वर्धिष्णू होऊन त्याचा लाभ स्वतःचे आणि इतरांचेही अध्यात्मिक पारमार्थिक आणि पारलौकिक जीवनमान उंचावण्याची सुप्त मनीषा आहे, त्या प्रत्येकाने उषा नगरीला एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी.

वेदांत कुलकर्णी ९९७०६६२४८, vedantkulkarni89

@vedantink