श्रीअरविंदांचे पुनरागमन
भारताच्या इतिहासात ‘1893’ या सालाचे फार मोठे महत्त्व आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताचा एक पुत्र जागतिक परिवर्तन घडविण्यासाठी शिकागोत गेला व अरविंद घोष त्याच वेळी पाश्चिमात्य देशातून भारत देशामध्ये आले. ‘अरविंद घोष ते योगी अरविंद’ या परिवर्तनाची सुरुवात याच वर्षी होईल हे फक्त अरविंदांना कळालं आणि तेही खूप सूचक संकेतांमधून. 6 फेब्रुवारी 1893, हे भारताच्या स्वातंत्र्य …