श्रीअरविंदांचे पुनरागमन

भारताच्या इतिहासात ‘1893’ या सालाचे फार मोठे महत्त्व आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताचा एक पुत्र जागतिक परिवर्तन घडविण्यासाठी शिकागोत गेला व अरविंद घोष त्याच वेळी पाश्चिमात्य देशातून भारत देशामध्ये आले. 

अरविंद घोष ते योगी अरविंद’ या परिवर्तनाची सुरुवात याच वर्षी होईल हे फक्त अरविंदांना कळालं आणि तेही खूप सूचक संकेतांमधून. 

6 फेब्रुवारी 1893, हे भारताच्या स्वातंत्र्य व उज्ज्वल भविष्य-वर्तमानातील अशी सुरुवात आहे ज्यायोगे या नव्या परतलेल्या युवकाला तपश्चर्येसाठी पहिली पायरी तयार करून देण्यात आली होती. 

  6 फेब्रुवारी 1893 ला 21 वर्षांचे अरविंद भारतात परत आले. या परत येण्यास अनेक विशेष गोष्टींचा हातभार होता.  14 वर्षांच्या परकीय जमिनीवरील वनवासानंतर, या भारतमातेच्या पुत्राने आपल्या मायभूमीवर परत एकदा पाय ठेवला होता. या 14 वर्षांमध्ये त्यांनी इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, जर्मन, या विविध भाषांमध्ये प्राविण्य मिळवले. विविध भाषांमध्ये कथा, काव्य, प्रबंध, या स्वरूपात साहित्य लेखन केले होते. 

लहानग्या अरविंदने भारत सोडला तेव्हा 1879 मध्ये तो फक्त सात वर्षांचा होता. कुठल्याही तरुणावर संस्कार होऊन, त्यांची मतं ठरवून, ती मांडता येणे हे सगळं ज्या परिपक्व काळात होतं, त्या काळात हा मुलगा युरोपात इंग्लंड देशात होता. ही 14 वर्षे त्याच्या वाटचालीवर प्रचंड प्रभाव टाकणारी होती. तो अशा परिपक्व वातावरणात वाढला होता जेथे आजूबाजूला भौतिक प्रगती होती, शास्त्रात नवे नवे शोध लागत होते आणि हे फक्त तिथल्या तिथे सीमित न राहता व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर प्रभाव टाकत होते.   

 पण या सगळ्या गोष्टी त्याच्या आत्म्याला, काळजाला साद घालू शकले नाहीत. त्याला हे सगळं असून सुद्धा भारताला जायची / भारतात परतण्याची  एक अनामिक ओढ मनात वाटायची. ती सर्वप्रथम आंतरिक पण नंतर सर्वव्यापी होत गेली. त्याचं मन सतत भारताच्या सुटकेसाठी, स्वातंत्र्यासाठी समर्पित होण्यासाठी वेधले  जायचे. ते नंतर सांगतात ,”ही ओढ माय देशाची नैसर्गिकच होती. भारतीय संस्कृतीची, इथले राहणीमान, वातावरण सर्व स्वरूपी भारतीय होण्यासाठी. अर्थात भारत मातेने देखील तिच्या पुत्राच्या स्वागत कसे आयोजिले होते? किती अनुभव अधिकारी पुरुष चमत्कार आणि स्वतः माताजींच्या  रूपात दर्शन. पण हे दर्शन घडवण्यासाठी तिच्या या भक्ताला, तिला तयारी करून घ्यायची होती.  त्यांची तपश्चर्या बारा वर्षांचा, अखंड तप. या सगळ्याची एक झलक म्हणून की काय साक्षात्कार रुपी अनुभव श्री अरविंद यांना मिळाला. ते त्यांच्या एका शिष्याबरोबर बोलताना लिहितात.

“ज्या क्षणी मी मुंबईच्या अपोलो बंदरावर माझे पहिले पाऊल ठेवले त्या क्षणापासून आध्यात्मिक अनुभवांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केला आणि या अनुभवांमध्ये अखंडत्वाची भावना विरक्ती पेक्षा अधिक होती. त्याच वेळी मला अनंतातील विविध गोष्टींबद्दल जागरूकता व्हायला सुरुवात झाली. माझ्यासाठी सर्वच काही ब्रम्हांड आहे व दिव्यत्व सर्वत्र आहे.” 

अरविंद यांच्यासाठी हा अनुभव विलक्षण आहे. याचे दुसरे कारण म्हणजे त्यांना भारतीय शास्त्राची तेव्हा काहीच माहिती नव्हती. तरीही झालेलं हे ज्ञान. त्यांना कुठलाच चमत्कार किंवा आध्यात्मिक अनुभव नव्हता व त्याची इच्छाही नव्हती. तरीही. आणि इंग्लंडमध्ये असताना वाद-विवाद, प्रयोग, प्रबंध, ह्यांचे मूळ विषय नास्तिकवाद व देवाच्या अस्तित्वावर असत.  हे असं असून सुद्धा हा अनुभव खरंच स्वागतानुभव म्हणावा लागेल.