श्री अरविंद केंद्र, औरंगाबाद

श्री ऑरोबिंदो सोसायटी, पाँडिचेरीचे योग साधना केंद्र


श्री अरविंद केंद्र, औरंगाबाद
या केंद्राची स्थापना 1972 साली झाली. युवकांनी युवकांसाठी चालवलेलं हे केंद्र अर्धशतक पूर्ण करत आहे. अर्धशतक पूर्ण करत असलेल्या या केंद्राने आजवर अनेक प्रकारचे उपक्रम केलेले आहेत. केंद्राने घेतलेल्या उपक्रमांमध्ये श्रीअरविंद व माताजी यांच्या साहित्यातील संकल्पनांचा अभ्यास, पाँडिचेरी येथील श्री अरविंद शिक्षण केंद्राच्या शिक्षण पद्धतीची ओळख, गीता फॉर युथ, वर्ल्ड ऑफ गुड थॉट्स, अंतर्नाद शिबीर, आतरशालेय निबंध स्पर्धा, पुस्तक परिचय, पुस्तक प्रदर्शने व विक्री, ट्रेकिंग, मूक-बधीर शाळेच्या मुलांशी संवाद आदी उपक्रमांचा समावेश आहे. पाँडिचेरी आणि नैनिताल या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी केंद्रातर्फे आतापर्यंत 150 विद्यार्थ्याना पाठवण्यात आले.
औरंगाबाद केंद्राचा विशेष म्हणजे या शिबिराला इथून दरवर्षी मुलीदेखील जातात आणि त्याच्यामुळे इतर सर्व केंद्रांना केवळ दोन सदस्य पाठवण्याची अनुमती असताना औरंगाबाद केंद्राला मात्र चार सदस्य पाठवण्याची अनुमती मिळते. औरंगाबाद केंद्राच्या परफॉर्मन्स हा पाँडिचेरी मध्ये अत्यंत चांगला आणि नावाजलेला असा आहे.
श्री अरविंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अनेकविध उपक्रम औरंगाबाद केंद्र हाती घेत आहे. स्वतःची वेबसाईट सुरू करण्याबरोबरच श्री अरविंद यांचं साहित्य आणि विचार साध्या सोप्या मराठी भाषेतून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणे आणि हे पोहोचवत असतानाच त्यांच्या मूळ विचारांशी कसलीही तडजोड न करणे, हे धोरण ठेवून इथला युवा गट काम करत आहे. या उपक्रमांमध्ये एक स्वतंत्र ब्लॉग लेखन, पुस्तक परिचय, एक शॉर्ट फिल्म व्हिडिओ तयार करणे, एक ऑडिओ तयार करणे, युट्युब व्याख्यानमाला सुरू करून बारा महिन्यांमध्ये बारा व्याख्याने देणे अशा पद्धतीने उपक्रमांची रचना करण्यात आलेली आहे

.