What we do ( केंद्राचे उपक्रम )

अनेक शिबिरं श्रीअरविंद सोसायटी व दिल्ली आश्रमातर्फे दरवर्षी घेण्यात येतात. युवकांच्या शारीरिक आणि आत्मिक विकासास योग्य दिशा आणि गती मिळेल अशी या शिबिरांची आखणी केलेली असते.

नैनितालमध्ये आठ दिवस तिथल्या पहाडी परिसरात ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग असे साहसी प्रकार अनुभवले जाऊ शकतात. सर्व भारतीय भाषांमध्ये गीतगायन केलं जातं. पाँडिचेरी शिबिरात योगाभ्यास, ध्यान याचा अनुभव, स्वतःची ओळख, जीवनातील ध्येय या विषयांवर तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांची व्याख्यानं आयोजित केली जातात. पाँडिचेरी आश्रमातील आध्यात्मिक आणि पुरोगामी तसंच शांत, स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरणाचाही अनुभव युवक घेतात. श्रीमाताजींनी वसविलेल्या ‘ऑरोव्हिले’  या जागतिक शहराची उद्दिष्ट आणि रचनाही समजावून दिली जाते. त्या शहराचे नियम असे आहेत की, तिथं व्यक्ती आपल्यातील सुप्त क्षमतांचा संपूर्ण विकास करून श्रीअरविंदांनी ठरवलेलं आध्यात्मिक उद्दिष्ट गाठू शकेल.

या दोन्ही शिबिरांमध्ये भारतातील विविध राज्यांतील युवक सहभागी होतात. श्रीअरविंद केंद्रात जीवन आणि जाणिवा संपन्न करणारे अनुभव मिळतात.

Geeta for Youth ( युवकांसाठी गीता )

पाँडिचेरी येथील श्रीअरविंद सोसायटीने ‘ गीता फॉर युथ ‘ या पुस्तकाचे प्रकाशन 1990 साली केले आणि त्यातूनच या समान नावाचा ‘गीता फॉर युथ’ हा उपक्रम केंद्रावर सुरू झाला.भगवदद्गीता हा जीवनाला आधार देणारा ग्रंथ आहे . तर्कबुद्धी विकसित करून विचक्षणपणे शोध घेण्याची क्षमता ती वाढवते. श्रद्धा बाळगणे आणि सर्वस्व समर्पित करणे हे गीतेच्या सहवासात आपसूक घडते. श्री अरविंद यांचे गीता चिंतन, मराठी भाषेतील विनोबा भावे यांची गीताई आणि गीता प्रवचने, विविध भाष्यग्रंथातील संदर्भ यांच्या आधारे गीतेचा स्वाध्याय होत असे. श्रीअरविंद केंद्रावर नियमित येणाऱ्या युवकांनी या गीता उपक्रमाच्या माध्यमातून गीतेची आणि सर्वांगीण जीवनाची तत्त्वे आत्मसात करत,
विविध भाष्यांच्या आधारे चर्चा करत स्वतः ला घडवले.

Antarnaad Workshop (अंतर्नाद शिबीर)

अंतर्नाद शिबीर
उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर केंद्रावरती आयोजित केले जात होते. साधारणपणे एका शिबिरात 40 विद्यार्थ्यांचा समावेश असे. या शिबिरातून गोष्टी सांगणे अर्धी गोष्ट सांगून ती विद्यार्थ्यांना पूर्ण करायला लावणे , हस्तकला, डोळ्यांचे व्यायाम, संगीत, विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शन आदी गोष्टी घडत होत्या. शीर्षकाला अनुसरून आपला आतला आवाज, आपली भूमिका बालकांनी ओळखावी यादृष्टीने ध्यान घेतले जात होते .
अंतर्नाद हा आमच्यासाठी एक रुणझुणत राहणारा , पैंजणांची किनकिन करणारा, सुरेख चिमण्यांच्या चिवचिवाटासारखा एक सुरेख अनुभव ठरला.

World of Good Thoughts
Antarnaad - Workshop
Book exhibition and Book Sale
Youth Camps at Nainital & Pondicherry
Interaction with Youth in Schools & Colleges by AuroYouth
Weekend Study Circle